

साहित्य :-
१) एक वाटी डाळीचे पीठ
२) दोन वाटया साखर
३) तीन वाटी वनस्पती तूप गरम करून
४) चिमुटभर सोडा
कृती :-
१) साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा . त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे .
२) नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे . असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे .
३) तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रांग येईपयंत मिश्रण हलवत राहावे . नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे . त्यानंतर हे भमश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा . व गार झाल्यानंतर थोड्यावेळाने म्हैसूर खाण्यासाठी द्यावा.