

पाणी हे जीवन आहे परंतु ते योग्य पद्धतीने
योग्य प्रमाणात योग्य वेळी प्यायलो तर
चुकीच्या पद्धतीने पीत असाल तर ते आपल्या
शरीरामध्ये अनेक आजारांचं कारण ठरू शकतं
एखाद्या रोपट्याला सुद्धा गरजेपेक्षा
जास्त पाणी दिलं तर ते जळतं त्याची वाढ
नीट होत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये
सुद्धा होतं आणि आजकाल तर अगदी 80 90%
पेशंट्स मध्ये पचनाच्या पोटाच्या तक्रारी
या खूपच वाढलेल्या दिसतात. आयुर्वेद
शास्त्रामध्ये तर रोगा हा सर्वेपी
मंदाग्ने म्हणजेच सर्वच रोगांच मूळ कारण
हे अग्निमांद्यवत झालेला आपल्या
शरीरामध्ये अन्नाच पचन करणारा जाठराग्नी
असतो तर त्याची शक्ती कमी होणं ज्याचं की
एक मुख्य कारण म्हणजेच अतिरिक्त किंवा
चुकीच्या पद्धतीने प्यायला गेलेलं पाणी
त्यातही जेवताना म्हणजे जेवणा आधी मध्ये
किंवा नंतर कधी पाणी प्यायचं किंवा किती
प्रमाणामध्ये कसं याचं सविस्तरपणे वर्ण
वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये आलेला आहे
ज्याची माहिती आपलं अन्न पचन व्यवस्थित
होण्यासाठी सर्वांनाच असलीच पाहिजे तर तीच
माहिती आजच्या या भागामध्ये आपण फक्त
माहित नाही तर अगदी व्यवस्थित समजून घेणार
आहोत कुठलीही गोष्ट समजून घेतली की
चांगल्या पद्धतीने ती आपल्याला पटते 100%
विश्वासाने दरवेळी आपण ती पाळतो आणि
त्याचे अद्भुत फायदे आपल्या शरीराला
मिळतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कुणीही
पुढे पुढे न पळवता स्किप न करता अगदी
शेवटपर्यंत पहा पाहायचा आहे समजून घ्यायचा
आहे आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनेल
अजूनही सबस्क्राईब केलेल नसेल पहिल्यांदाच
व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा
ज्यामुळे अगदी मोफतपणे सर्व आरोग्य विषयक
व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत
राहतील त्यासाठीचा सविस्तर श्लोक असा आहे
अजीर्ण भेषजम वारी जिर्णे वारी बलप्रदम
भोजनेचामृतम वारी भोजनांते विषप्रदम वारी
म्हणजेच पाणी साध्या सोप्या भाषेमध्ये
सांगायचं झालं तर जेवणा अगोदर साधारण
अर्धाभर तास आणि जेवण झाल्यानंतर किमान
तास दीड तास तरी अतिप्रमाणात म्हणजेच
तांब्याभर वगैरे असं पाणी पिऊ नये खूपच
तहान लागली दोन तीन घोट पिऊ शकता जेवणा
आधी अर्धा तास का प्यायचं नाही थोडासा
समजून घ्या आपल्याला भूक लागते म्हणजेच
आपल्या शरीरामध्ये अन्नाच पचन करणारा
जाठराग्नी हा प्रज्वलित होत असतो पेटत
असतो आणि अशा या पेटलेल्या अग्नीवर आपण
भसकन तांब्याबरोबर पाणी टाकलं तर तो अग्नी
विजतो त्यानंतर आपण जे काही अन्न खाणार
आहे त्याचं पचन व्यवस्थितपणे होत नाही मग
अजीर्ण इनडायजेशन ब्लोटिंग पोट जड राहणं
अशा तक्रारी होत राहतात मॉडर्न सायन्स
प्रमाणे सुद्धा आपल्याला जेव्हा भूक लागते
भुकेची जाणीव होते भुकेची वेळ होते तर
त्यावेळेला जठरामध्ये एच सी एल
हायड्रोक्लोरिक ऍसिड हा मुख्य पाचक
स्त्राव आहे तो अन्नपचन करण्यासाठी खूप
आवश्यक असतो तर तो सक्रट होत असतो आणि हे
ऍसिड आहे या ऍसिड मध्ये जर का तुम्ही
अतिप्रमाणात पाणी टाकलं तर ते सुद्धा
न्यूट्रलाईज होतं परिणामतः पचन नीट होत
नाही तसच आयुर्वेद शास्त्रानुसार
वातदोष देखील वाढतो साधं उदाहरण घ्या
अग्नीवर तुम्ही पाणी टाकलं की त्यानंतर
धूर सगळीकडे पसरतो तर तसच आपल्या
पोटामध्ये सुद्धा हा धूर म्हणजेच वायू
सांगितलेला आहे आणि वाताचे साधारण 80 आजार
होण्याचा धोका सुद्धा आपल्याला वाढतो भूक
खूप जास्त लागत असेल तर वजन कमी करायचा
आहे तर अशा वेळेला तुम्ही जेवणा अगोदर
15-20 मिनिट एक ग्लासभर पाणी प्या
ज्याच्यामुळे की तुमचं अन्न थोडसं कमी
खाल्लं जाईल आणि वजन कमी होण्यासाठी ते
मदत करेल जेवणानंतर तास दीड तास पाणी
प्यायचं नाही अति प्रमाणामध्ये जेवण
झाल्यानंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी अन्न
खाली सरकण्यासाठी दोन-तीन घोट किंवा
थोडंसं पाणी नक्कीच पिऊ शकता परंतु
तांब्याभर वगैरे असं अतिप्रमाणात प्यायचं
नाही याचं मुख्य कारण म्हणजे की जेवण
झाल्यानंतर अन्न पचनाची प्रक्रिया म्हणजेच
अन्न हे जठरामध्ये घुसळलं जातं तर तुम्ही
खूप असं तांब्याभर पाणी प्यायलत की हे खूप
जास्त पातळ असा स्राव तयार होतो जठरामध्ये
तो व्यवस्थितपणे घुसळला जात नाही आणि मग
त्याचं पचन नीट होत नाही अन्न हे बराच काळ
एकाच ठिकाणी पडून राहतं अन्न बराच काळ एका
ठिकाणी पडून राहिलं की ते सडतं आंबळण्याची
प्रक्रिया होते त्यातूनच मग आम्लपित्त
आंबट करपट ढेकरा किंवा हे घुसळलं जात
असतानाच खूप पातळ झाल्यामुळे वरच्या
दिशेने फेकलं जातं अन्ननलिकेच्या किंवा
घशामध्ये असं आंबट पाणी आंबट गुळणे
आल्यासारखं वगैरे बऱ्याच जणांची तक्रार
असते किंवा हे तसं आंबलेलं जे काही मिश्रण
आहे तेच पुढे आतड्यांकडे सुद्धा जातं आणि
मग पोट व्यवस्थित साफ होत नाही खूप पातळ
फेसाळ अशी द्रव मल प्रवृत्ती दिवसातून चार
पाच वेळेला होते तरी देखील पोट साफ
झाल्याच समाधान वाटत नाही आणि हे असं
आमलेलं पोटामध्ये तसच साठत जात तर
त्याच्यातून आमदोष शरीरात तयार होतो आमदोष
हा एक स्लो पॉयझन सांगितलेला आहे की
ज्यामुळे अनेक विविध आजार आपल्या
शरीरामध्ये तयार होत असतात तसच जेवण
झाल्यानंतर खूप जास्त तुम्हाला पाणी
पिण्याची सवय असेल तर कफ दोष सुद्धा वाढतो
बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की जेवण
झालं की घशामध्ये कफ सतत आल्यासारखं वाटतं
किंवा मग बराच काळ अशी जर का तुम्हाला सवय
असेल तर कफाचे विविध आजार त्यामध्ये
अंगावर चरबी सूज येणं किंवा सर्दी खोकला
लर्जीची सर्दी
नाक ब्लॉक होण नाकाचं हाड वाढणं किंवा
उतारवयामध्ये
डायबिटीस सारखे वगैरे जे आजार आहेत
पीसीओडी हे सुद्धा होण्याचा जो धोका आहे
तो वाढतो म्हणूनच भोजनेचा वारी म्हणजे
जेवतानाच जेवणाच्या मध्ये घोटघोट पाणी
पिणं हे अमृताप्रमाणे काम करत त्यामुळे
घासही कोरडा वाटत नाही पचन देखील
व्यवस्थितपणे होतं हे पाणी कोमट असेल तर
उत्तम विशेषतः जर का तुम्हाला वजन कमी
करायचं असेल पचनाच्या कुठल्याही तक्रारी
असतील डायबिटीस आहे किंवा गॅसचा वगैरे
त्रास होतोय पोट साफ होत नाहीय तर कोमट
पाणीच प्यावं पण याच प्रमाण सुद्धा खूप
महत्त्वाचं ठरतं फक्त अर्धा ग्लास पाणी हे
आपल्याला घ्यायच आहे आणि तेवढंच जेवणाच्या
मध्ये घोटघोट घ्यायच आहे तीन चार घासानंतर
एक दोन घोट असं पिऊ शकता याचं महत्त्वाचं
कारण समजून घ्या की आयुर्वेद
शास्त्रामध्ये अन्न खात असताना आपल्या
पोटाचे चार भाग मानावेत असं सांगितलेल आहे
त्यातील दोन भाग हे घन पदार्थ भात भाजी
भाकरी यांच्यासाठी एक भाग हा द्रव पदार्थ
म्हणजे जेवणामध्ये जे काही द्रव तुम्ही
घेताय ताक सूप वरण आमटी तर यासाठी आणि
उरलेला एक भाग हे व्यवस्थितपणे मिक्स होऊन
फिरण्यासाठी
याच्या पचण्यासाठी रिकामा ठेवावा खूप
जास्त जर का तुम्ही पाणी प्यायला तर तो जो
एक भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आहे तो
राहत नाही सर्वच मिश्रण अगदी पातळ असं
होऊन जातं आणि मग मघाश शी
सांगितल्याप्रमाणे जे सर्व त्रास आहेत
पातळ मिश्रणामुळे ते होतात पचन तर नीट होत
नाहीतच व्यवहारातलं एक साधं उदाहरण घ्या
स्त्रियांना तर हे लगेचच पटेल काहीही
मिक्सरमध्ये आपल्याला इडलीचं वाटण किंवा
चटणी वगैरे बनवायची असते त्यावेळेला
सुद्धा आधी किंवा नंतर पाणी टाकलं तर
त्याचा आपल्याला अंदाजच येत नाही वाटण करत
असतानाच आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं
व्यवस्थितपणे पाणी टाकावं लागतं जेणेकरून
त्याच स्मूथ बॅटर तयार होईल किंवा कणिक
मळतानाच सुद्धा उदाहरण घ्या की मध्येच
आपल्याला व्यवस्थित त्याचा अंदाज घेऊन
थोडं थोडसं पाणी टाकाव लागतं आधीच खूप
पाणी टाकलं किंवा शेवटी पाणी टाकलं किंवा
अति पाणी झालं कमी पाणी पडलं तरी सुद्धा
आपल्याला जे अपेक्षित कार्य आहे जी कणिक
त्याचा व्यवस्थित गोळा तयार होणं अपेक्षित
आहे ते होत नाही तशाच पद्धतीने जेवणाचा
सुद्धा लक्षात घ्या आणि याचे जे नियम आहेत
ते नक्की पाळा त्याचा 100% फायदा होणारच
आहे