
सध्या गाजत असलेले सर्वत्र गाजत असलेला व 10 दिवस होऊनही अजुनही थिएटरमध्ये टिकून असलेला चित्रपट म्हणजे शैतान. शैतान हा चित्रपट त्या बॉलीवूड चित्रपटापैकी एक आहे की, जे चित्रपट बघताना ह्रदयामध्ये धडकी भरते, हृदय थांबते की काय असे वाटते.

हि कहानी आहे घरी आलेल्या एका अनामिक पाहुण्याची, जो घरातील मुलीला वश करून पालकांच्या संमतीने घेऊन जाण्याचा प्रयत्नात आहे. परंतू पालक म्हणजे अजय देवगण व त्याची पत्नी मुलीला घेऊन जाण्यास नकार देतात. तो अनामिक पाहुणा म्हणजे आर माधवन वश केलेल्या मुलीच्या सहाय्याने त्यांना धमकी देऊन व प्रसंगी तीच्या सख्या भावाला तीच्या सहाय्याने मारण्याचा प्रयत्न करून, त्यांना तिला घेऊन जाण्यास संमती देण्यासाठी भाग पाडतो.
आर माधवन ला मुलीला घेऊन जाण्यासाठी आई वडीलांची संमती का लागते ?, ती त्याच्या वशमध्ये असल्यामुळे तो तिला असही तसंही घेऊन जाऊ शकत होता. मग पालकांची म्हणजे अजय देवगणची व पत्नीची संमती का ?
ते तर तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. चित्रपटाचे पुर्ण बजेट हे 60 कोटी रूपयांचे आहे. परंतू चित्रपटाचा सध्याचा रिस्पॉन्स बघता अजून 2 अठवडे तरी टिकेल व बंपर कमाई करेल.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.